सचिन जुवाटकर
"चित्र एक आध्यात्मिक उपासना"
आपल्या समोर हा विचार मांडाताना अतिशय आनंद होत आहे. मी गेली दोन तप वास्तववादी चित्रशैलीत सुजनात्मक चित्रनिर्मिती करीत आहे. निसर्गातील सकारात्मक ऊर्जा स्वतःच्या चित्रांमधून साकारताना ह्या भूतलावर क्षणोक्षणी मला स्वतःला ह्या ईश्वरी रचनेचा माध्यम असल्यासारखेच जाणवत आहे.
माझे गुरु प. पु. गगनगिरी महाराजांनी सांगितलेल्या दर्शनशास्त्र , पदार्थशास्त्र, मुहूर्तशास्त्र ह्या वैदिक शास्त्रांचा चित्रातील संबंध आज परिणाम दाखवू लागला.
माझे कोणतेही चित्र पाहताना प्रत्येक रसिकांस त्याच सकारात्मक ऊर्जेची अनुभूती सुद्धा येत आहे.